आमच्याबद्दल

जिव्हाळा को ऑप. क्रेडिट सोसायटी लि .

किसननगर वागळे इस्टेट परिसरातील सामान्य नागरिक ,छोटे व्यावसायिक ,दुकानदार ,यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्याच्या हेतुने श्री मगनलाल ठक्कर ,स्वर्गीय श्री महादेव महाडिक शेठ ,स्वर्गीय श्री धोंडीराम जगताप ,श्री भुपतराय व्यास ,श्री हणुमंत ढाणे ,श्री सुखदेव पाटील ,तसेच श्री तुकाराम महाडिक यांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला .

पतसंस्थेची स्थापना करण्याकरिता ३०० सभासद आणि ३०००० भाग भांडवलाची उभारणी करून महाराष्ट्र सहकारी संस्था आधिनियम १९६० अंतर्गत नोंदणी करण्यात आली. सदर संस्था जिव्हाळा को ऑप. क्रेडिट सोसायटी लि . या नावाने नोंदणी कृत करण्यात आली असून संस्थेचा नोंदणी नं.टी.एन.ए. (टी.एन.ए.)आर.एस.आर.(सी.आर.) ८४३/९७-९८ हा आहे.

जिव्हाळा को ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय श्री महादेव महाडिक शेठ यांचे कुशल नेतृत्व संस्थेला लाभले. आज ठाणे जिल्ह्यातील नामंकित संस्था असुन जिव्हाळा को ऑप. क्रेडिट सोसायटी नावलौकीक आहे.

संस्थेचे मुख्य कार्यालय नटराज अपार्टमेंट,पहिला माळा ,किसननगर नं.३, ठाणे येथे आहे. संस्थेची दुसरी शाखा गणेश कृपा अपार्टमेंट,डवले नगरे,ठाणे येथे आहे. संस्थेचे मुख्यालय व शाखेची जागा स्वमालकीची आहे. आम्ही संख्यात्मक प्रगतीवरच नव्हे तर संस्थेच्या गुणात्मक विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. संस्थेचा कर्मचारी व दैनंदिन प्रतिनीधि हे संस्थेचा आधार आहेत. ते आमच्या ग्राहक सभासद याना प्रभावी व जलद सेवा पुरवित असतात. संस्थेचा कारभार पारदर्शक असून संचालक मंडळ नेहमी कामकाजात लक्ष देत असतात.

संस्थेच्या दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत डॉ. नानजीभाई खिमजीभाई ठक्कर सल्लागार म्हणुन संस्थेत कार्यरत असुन संस्थेच्या दरवर्षी वार्षिक सर्व साधारण सभेत गुणवंत विद्याथ्यांचे शालेय वस्तु देवुन सत्कार करत असतात. संस्थेला २२ वर्ष पूर्ण झालेले असुन संस्थेस 'अ ' वर्ग मिळाला आहे संस्थेने चालू वर्षात १० कोटी खेळते भांडवल पुर्ण केलेले आहे संस्थेचा १५ कोटींचा समीश्र व्यवसाय करण्याचा उद्देश आहे.

संस्थेचे अध्यक्ष उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची नेत्रदिपक अशी प्रगती केली आहे. संस्थेचे सचिव श्री.हणमंत ढाणे हे पूर्ण वेळ संस्थेस देत असुन प्रशासन आधिक गतिमान होण्यास मदत झाली. संस्थेचे अध्यक्ष व सचिव सहकारी संचालकांना विश्वसात घेउन संस्थेच्या नियमावली नुसार उत्तम काम करीत आहोत. संचालक मंडळ विविध प्रकारच्या कर्जाच वितरण करत आहेत. तसेच ठेवीदारास जास्तीत जास्त ठेवींसाठी व्याज दिले जाते . सध्यांच्या ठेवींचा व्याज दर ११% आहे.

आमच्या ब्रिद वाक्यानुसार "सतफलाय सहकारिता" आम्ही आमच्या सामाजिक जबाबदारी आणि वचन बंधतेचे पालन करित आहे.

उद्देश व दृष्टीकोन

ठाणे जिल्ह्यात एक आदर्श सहकारी संस्था तयार करण्याचा उद्देश आहे.
संस्थेच्या ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा प्रदान करण्याचा हा दृष्टीकोन आहे .